news

“मुजरा शिवरायांना”

दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त “मुजरा शिवरायांना” या कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवरायांना कलात्मक अभिवादन सादर केले.

एकांकिका महोत्सव 

आचार्य भरतमुनि गुरुकुल (स्नेह पुणे संचालित), म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे आणि संस्कारभारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.  योगेश सोमण लिखित व दिग्दर्शित “एकांकिकांचा महोत्सव” दिनांक ११, १२ फेब्रुवारी २०२३ वेळ: सायं ६ ते ९ स्थळ : गणेश हॉल, न्यु इंग्लिश स्कूल, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. ४११०३०.  

म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे घाशीराम कोतवाल या प्रसिध्द नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मानवंदना

घाशीराम कोतवाल या प्रसिध्द नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यातील नांदीचे सादरीकरण केले आणि या अजरामर कलाकृतीला मानवंदना दिली. त्याची काही क्षणचित्रे

म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे लघुचलचित्रोत्सवातील चलचित्रांचे परीक्षण

संस्कृत भारती तर्फे लघुचलचित्रोत्सव (Sanskrit shortfilm festival) आयोजित करण्यात आला असून त्यातील चलचित्रांचे परीक्षण प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. योगेश सोमण सर व संस्कृत भारतीचे अ.भा.प्रचार प्रमुख मा. शिरीष भेडसगावकर यांच्या उपस्थितीत, प्रा. रश्मी देव (प्राध्यापिका नाट्यविभाग – म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग …

म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे लघुचलचित्रोत्सवातील चलचित्रांचे परीक्षण Read More »

महाविद्यालयाचे प्रमुख सल्लागार , योगेश सोमण यांना भा. रा. तांबे साहित्यकृती पुरस्कार जाहीर

महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक आणि लोकप्रिय अभिनेते, लेखक व दिग्दर्शक मा. श्री योगेश सोमण यांना मध्यप्रदेश शासनाचा  भा. रा. तांबे साहित्यकृती पुरस्कार जाहीर झाला असून म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्ससाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

अभिनय कौशल्य कार्यशाळेची सांगता

स्नेह, पुणे संचालित आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित तीन महिन्यांच्या ‘अभिनय कौशल्य कार्यशाळेची’ दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सांगता झाली. श्री. योगेश सोमण सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर २०२२ पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार सायं. ६ ते ९ या कालावधीत, ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली. …

अभिनय कौशल्य कार्यशाळेची सांगता Read More »

‘रोप मल्लखांब’ कार्यशाळेचे महाविद्यालयात आयोजन

मल्लखांब या खेळाचे आधारस्तंभ असलेले मा. श्री. उदय देशपांडे  यांची ‘रोप मल्लखांब’ या क्रीडाप्रकाराची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ६ दिवसीय कार्यशाळा दिनांक १४  ते १९ नोव्हेंबर  २०२२ या कालावधी मध्ये,  महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेची काही क्षणचित्रे

सरपोतदार करंडक २०२२ मध्ये मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे यश

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे आयोजित सरपोतदार करंडक २०२२, आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत  मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले. बक्षिसाचे स्वरूप करंडक, प्रशस्तीपत्र व रुपये ५०००/- असे आहे. प्रसंगनाट्यासाठी ‘जुगार’ हा विषय देण्यात आला होता. यास्पर्धेच्या माध्यमाद्वारे  विद्यार्थ्यांमधील संघकार्य, उत्स्फूर्तता, सर्जनशीलता, इत्यादी गुणांची कसोटी लागली.