सूचना

अभिनय कौशल्य कार्यशाळेची सांगता

स्नेह, पुणे संचालित आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित तीन महिन्यांच्या ‘अभिनय कौशल्य कार्यशाळेची’ दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सांगता झाली. श्री. योगेश सोमण सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर २०२२ पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार सायं. ६ ते ९ या कालावधीत, ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली. …

अभिनय कौशल्य कार्यशाळेची सांगता Read More »

‘रोप मल्लखांब’ कार्यशाळेचे महाविद्यालयात आयोजन

मल्लखांब या खेळाचे आधारस्तंभ असलेले मा. श्री. उदय देशपांडे  यांची ‘रोप मल्लखांब’ या क्रीडाप्रकाराची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ६ दिवसीय कार्यशाळा दिनांक १४  ते १९ नोव्हेंबर  २०२२ या कालावधी मध्ये,  महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेची काही क्षणचित्रे

शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या कार्यशाळेचे आयोजन

शाहीर हेमंतराजे मावळे यांची पोवाडा, भारुड, दिंडी, फटका अश्या लोकाकलांची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ४ दिवसीय कार्यशाळा ११ ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेच्या आजच्या पहिल्या दिवसाची काही क्षणचित्रे

डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि स्वरावर्तन फाउंडेशन यांच्या तर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांगीतिक सोहळा रविवारी सायंकाळी ५ वाजता म. ए. सो सभागृह, मयूर …

डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन Read More »

‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाच देशाची फाळणी झाली. त्यामुळे दि. १ ऑगस्ट  ते १५ ऑगस्ट १९४७ या काळात भारतात काय परिस्थिती होती याचे विस्तृत वर्णन असलेल्या श्री. प्रशांत पोळ लिखित ‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन दि. १४, १५, आणि १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय विचार साधना सभागृह, सदाशिव पेठ येथे करण्यात आले. अशा या …

‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन Read More »

“गूंजे बनकर देश राग”

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि म ए सो कलावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त “गूंजे बनकर देश राग “ हा संगीत, नृत्याचा कार्यक्रम शनिवार  दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी म ए सो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.    या कार्यक्रमात देस रागावर आधारित अनेक गायन  व नृत्य  प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. या मध्ये लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, …

“गूंजे बनकर देश राग” Read More »