“मुजरा शिवरायांना”
दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त “मुजरा शिवरायांना” या कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवरायांना कलात्मक अभिवादन सादर केले.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त “मुजरा शिवरायांना” या कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवरायांना कलात्मक अभिवादन सादर केले.
आचार्य भरतमुनि गुरुकुल (स्नेह पुणे संचालित), म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे आणि संस्कारभारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. योगेश सोमण लिखित व दिग्दर्शित “एकांकिकांचा महोत्सव” दिनांक ११, १२ फेब्रुवारी २०२३ वेळ: सायं ६ ते ९ स्थळ : गणेश हॉल, न्यु इंग्लिश स्कूल, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. ४११०३०.
घाशीराम कोतवाल या प्रसिध्द नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यातील नांदीचे सादरीकरण केले आणि या अजरामर कलाकृतीला मानवंदना दिली. त्याची काही क्षणचित्रे
संस्कृत भारती तर्फे लघुचलचित्रोत्सव (Sanskrit shortfilm festival) आयोजित करण्यात आला असून त्यातील चलचित्रांचे परीक्षण प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. योगेश सोमण सर व संस्कृत भारतीचे अ.भा.प्रचार प्रमुख मा. शिरीष भेडसगावकर यांच्या उपस्थितीत, प्रा. रश्मी देव (प्राध्यापिका नाट्यविभाग – म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग …
म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे लघुचलचित्रोत्सवातील चलचित्रांचे परीक्षण Read More »
महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक आणि लोकप्रिय अभिनेते, लेखक व दिग्दर्शक मा. श्री योगेश सोमण यांना मध्यप्रदेश शासनाचा भा. रा. तांबे साहित्यकृती पुरस्कार जाहीर झाला असून म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्ससाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
स्नेह, पुणे संचालित आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित तीन महिन्यांच्या ‘अभिनय कौशल्य कार्यशाळेची’ दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सांगता झाली. श्री. योगेश सोमण सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर २०२२ पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार सायं. ६ ते ९ या कालावधीत, ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली. …
स्वरवेध गायन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म ए सो कलावर्धिनी आणि म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांनी ‘स्वरवेध सुगम गायन’ स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी केले होते. म ए सो च्या सर्व शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटन …
स्वरवेध उद्घाटन निमंत्रण
मल्लखांब या खेळाचे आधारस्तंभ असलेले मा. श्री. उदय देशपांडे यांची ‘रोप मल्लखांब’ या क्रीडाप्रकाराची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ६ दिवसीय कार्यशाळा दिनांक १४ ते १९ नोव्हेंबर २०२२ या कालावधी मध्ये, महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेची काही क्षणचित्रे