स्वरवेध गायन स्पर्धा

स्वरवेध गायन स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म ए सो  कलावर्धिनी आणि म ए सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांनी ‘स्वरवेध सुगम गायन’ स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी केले होते.
म ए सो च्या सर्व शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रियदर्शनी कुलकर्णी ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मएसो चे नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. आर्कि. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी अध्यक्ष पद भूषविले. या स्पर्धेचे परीक्षण गौरी जोशी, शुभांगी मांडे आणि  महावीर बागवडे यांनी केले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित
होत्या तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आनंद लेले यांनी अध्यक्ष पद भूषविले. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेची काही क्षणचित्रे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *