events

‘रोप मल्लखांब’ कार्यशाळेचे महाविद्यालयात आयोजन

मल्लखांब या खेळाचे आधारस्तंभ असलेले मा. श्री. उदय देशपांडे  यांची ‘रोप मल्लखांब’ या क्रीडाप्रकाराची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ६ दिवसीय कार्यशाळा दिनांक १४  ते १९ नोव्हेंबर  २०२२ या कालावधी मध्ये,  महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेची काही क्षणचित्रे

सरपोतदार करंडक २०२२ मध्ये मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे यश

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे आयोजित सरपोतदार करंडक २०२२, आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत  मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले. बक्षिसाचे स्वरूप करंडक, प्रशस्तीपत्र व रुपये ५०००/- असे आहे. प्रसंगनाट्यासाठी ‘जुगार’ हा विषय देण्यात आला होता. यास्पर्धेच्या माध्यमाद्वारे  विद्यार्थ्यांमधील संघकार्य, उत्स्फूर्तता, सर्जनशीलता, इत्यादी गुणांची कसोटी लागली.

‘उत्सव शब्दांचा’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग

वाचन प्रेरणा दिना निमित्त पुस्तकांचं गाव विश्वस्त संस्था आयोजित ‘उत्सव शब्दांचा’ या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन भिलार या पुस्तकांच्या गावात केले गेले होते. उत्कृष्ट कलानिर्मितीसाठी तरुण कलाकारांनी काय वाचायला हवे? या विषयावर उदघाटक डॉ. उमा कुलकर्णी, तसेच मंगला गोडबोले, पुरुषोत्तम बेर्डे, योगेश सोमण, मिलिंद शिंत्रे आणि अभिराम भडकमकर अशा विविध मान्यवर मार्गदर्शकांची सत्रे झाली महाविद्यालयातील …

‘उत्सव शब्दांचा’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग Read More »

शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या कार्यशाळेचे आयोजन

शाहीर हेमंतराजे मावळे यांची पोवाडा, भारुड, दिंडी, फटका अश्या लोकाकलांची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारी ४ दिवसीय कार्यशाळा ११ ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये, मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेच्या आजच्या पहिल्या दिवसाची काही क्षणचित्रे

स्वरावर्तन फाउंडेशन, म.ए.सो.च्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे सांगीतिक सत्कार सोहळा

पुणे : आई-वडिल, गुरूंचे आशिर्वाद, रसिकांचे प्रेम-साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला या पेक्षा काय आवश्यक आहे? माझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहे; मी भाग्यवान आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या. माझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा, ही एकच इच्छा आहे. आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त …

स्वरावर्तन फाउंडेशन, म.ए.सो.च्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे सांगीतिक सत्कार सोहळा Read More »

डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि स्वरावर्तन फाउंडेशन यांच्या तर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांगीतिक सोहळा रविवारी सायंकाळी ५ वाजता म. ए. सो सभागृह, मयूर …

डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन Read More »

मूक-अभिनय कार्यशाळा (Mime Workshop)

दि. २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे  कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मूक-अभिनय कार्यशाळा (Mime Workshop)  मएसो मुलांचे विद्यालयातील (भावे स्कूल) प्राचार्य प्र. ल. गावडे सभागृहात  आयोजित केली आहे .या कार्यशाळेची संकल्पना महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या …

मूक-अभिनय कार्यशाळा (Mime Workshop) Read More »

‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाच देशाची फाळणी झाली. त्यामुळे दि. १ ऑगस्ट  ते १५ ऑगस्ट १९४७ या काळात भारतात काय परिस्थिती होती याचे विस्तृत वर्णन असलेल्या श्री. प्रशांत पोळ लिखित ‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन दि. १४, १५, आणि १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय विचार साधना सभागृह, सदाशिव पेठ येथे करण्यात आले. अशा या …

‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन Read More »

“गूंजे बनकर देश राग”

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि म ए सो कलावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त “गूंजे बनकर देश राग “ हा संगीत, नृत्याचा कार्यक्रम शनिवार  दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी म ए सो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.    या कार्यक्रमात देस रागावर आधारित अनेक गायन  व नृत्य  प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. या मध्ये लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, …

“गूंजे बनकर देश राग” Read More »

मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांचा ‘द प्लॅन’ यशस्वी 

 २० जुलै, २०२२ ला ‘द प्लॅन’  या नाटकाचा प्रयोग भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘भारत रंग महोत्सवात’ यशस्वीरित्या  झाला.या प्रयोगासाठी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री  श्रीमती मीनाक्षी लेखी पूर्ण वेळ उपस्थित होत्या. ‘द प्लॅन’ च्या संपूर्ण टीम चे तसेच लेखन व दिग्दर्शनाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. याच बरोबर या नाटकाचे प्रयोग भारतात सर्वत्र होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. …

मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांचा ‘द प्लॅन’ यशस्वी  Read More »