आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाच देशाची फाळणी झाली. त्यामुळे दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
१९४७ या काळात भारतात काय परिस्थिती होती याचे विस्तृत वर्णन असलेल्या श्री. प्रशांत पोळ लिखित
‘ते पंधरा दिवस’ या पुस्तकाचे अभिवाचन दि. १४, १५, आणि १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भारतीय विचार साधना सभागृह, सदाशिव पेठ येथे करण्यात आले.
अशा या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि संकलन महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री.योगेश सोमण यांनी केले होते तर महाविद्यालयाच्या नाट्य विभागाच्या प्रा.रश्मी देव यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते.
मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, स्नेह पुणे आणि संस्कार भारती, पुणे महानगर – नाट्य
विधा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात एकूण १८ कलाकार सहभागी होते त्यापैकी मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे १२ विद्यार्थी कलाकार सहभागी होते.