विद्यार्थी मित्रांनो,
नमस्कार!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे नृत्य, नाटक आणि संगीत या प्रयोगजिवी कलांमध्ये उच्च शिक्षण दिले जाते. हे महाविद्यालय महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. या महाविद्यालयात नृत्यामध्ये (कथक, भरतनाट्यम), नाट्यशास्त्र आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत(गायन,वादन) याचा विनाअनुदानित पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो.
नवोदित विद्यार्थ्याच्या कलात्मकतेला वाव देणे, उभारी देणे, संगोपन करणे हे महाविद्यालयाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. कलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले महाविद्यालय हे एक उत्तम व्यासपीठ आहे.येथे तुम्हाला कलाक्षेत्रातील प्रथितयश कलाकारांबरोबर संवाद साधण्याची व त्यांच्याकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी मिळेल.
महाविद्यालयात अनुभवी, उत्साही व प्रयोगशील प्राध्यापकवृंद व कार्यालयीन कर्मचारी आहेत, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच प्रयत्नशील असतात.महाविद्यालयात कलेच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व अनुभव असलेल्या अतिथी प्राध्यापकांचे मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना मिळते. कलेसाठी पूरक वातावरण व पायाभूत सुविधांनी सुसज्ज, असे हे महाविद्यालय पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे.महाविद्यालयात अभ्यासक्रमाशी निगडीत तसेच इतर अंतर्गत व बाह्य उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कायम प्रोत्स्ताहित केले जाते.महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी
मला हे नोंदवण्यास अत्यंत आनंद होत आहे की महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे स्पष्ट आणि योग्य दृष्टी आहे आणि महाविद्यालयाचे ध्येय साध्य करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की आमचे महाविद्यालय तुम्ही निवडलेल्या कलाक्षेत्रात उत्तम असे शिक्षण तुम्हाला देईल व माझा असा विश्वास आहे की तुम्ही कलेच्या क्षेत्रात नवीन पायंडे पाडाल आणि यशाची शिखरे गाठाल.
प्रा. (डॉ.) पी. बी. बुचडे
मानद प्राचार्य