www.collegeofperformingarts.mespune.in
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्
Pune, Maharashtra, India
मएसो
कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे
विविध कलांचे शिक्षण उपलब्ध करून देणारी ‘मएसो’ची नवी शाखा
महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेला
गायन, वादन, नृत्य, अभिनय आदी कलांचे प्रशिक्षण देणारा - विनाअनुदानित पदवी अभ्यासक्रम
बीए (परफॉर्मिंग आर्ट्स - नृत्य, नाटक, संगीत)
किमान पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतून इ. १२ वी उत्तीर्ण.
प्रवेशासाठी संपर्क : 020-41038157/58, +91 9011090715
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्रविस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षणाकडे केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून न पाहता त्यापलीकडे जाऊन चांगला माणूस व सजग नागरिक घडविणे यावर म.ए.सो.चा भर राहिला आहे.