“गूंजे बनकर देश राग”

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि म ए सो कलावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त “गूंजे बनकर देश राग “ हा संगीत, नृत्याचा कार्यक्रम शनिवार  दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी म ए सो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.    या कार्यक्रमात देस रागावर आधारित अनेक गायन  व नृत्य  प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. या मध्ये लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, …

“गूंजे बनकर देश राग” Read More »

मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांचा ‘द प्लॅन’ यशस्वी 

 २० जुलै, २०२२ ला ‘द प्लॅन’  या नाटकाचा प्रयोग भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘भारत रंग महोत्सवात’ यशस्वीरित्या  झाला.या प्रयोगासाठी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री  श्रीमती मीनाक्षी लेखी पूर्ण वेळ उपस्थित होत्या. ‘द प्लॅन’ च्या संपूर्ण टीम चे तसेच लेखन व दिग्दर्शनाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. याच बरोबर या नाटकाचे प्रयोग भारतात सर्वत्र होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. …

मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांचा ‘द प्लॅन’ यशस्वी  Read More »

‘भारत रंग महोत्सवात’ मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् चे विद्यार्थी झळकणार !!!

‘द प्लॅन’ या नाट्याची निर्मिती  संस्कार भारती पश्चिम प्रांताची असून, आयोजन विवेक व्यासपीठाने केले आहे. याचे लेखन अभिनेते/दिग्दर्शक/लेखक श्री. योगेश सोमण ( मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् चे मुख्य सल्लागार) यांनी केले असून दिग्दर्शन श्री. योगेश सोमण आणि सहा. प्रा. रश्मी देव, मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस्, नाट्य विभाग असे दोघांनी केले आहे. या नाटकात …

‘भारत रंग महोत्सवात’ मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् चे विद्यार्थी झळकणार !!! Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयात व्याख्यान झाले.

आज महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त संगीत विभागाच्या मार्गदर्शक मा. अंजली ताई  मालकर यांचे व्याख्यान झाले. कलाकाराच्या आयुष्यातील गुरुचे स्थान , त्यांचे महत्व ताईंंनी वेगवेगळ्या गोष्टींद्वारे मांडले.  या प्रसंगी सर्व विभागांचे विद्यार्थी तसेच प्रा. रश्मी देव (नाट्य विभाग), प्रा. सुखदा दीक्षित (संगीत विभाग) आणि प्रा. वृषाली लेले (भरतनाट्यम् विभाग ), आदित्य देशमुख (समन्वयक) आणि पौरवी  साठे (समन्वयक) उपस्थित होते.   …

गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयात व्याख्यान झाले. Read More »

गुरुपौर्णिमा २०२२

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध कार्येक्रम करण्यात आले. सुरवातीला समन्वयक प्रा.पौरवी साठे आणि प्रा. आदित्य देशमुख यांनी दीपप्रज्वलन केले, संस्थापकांचे आणि महर्षी वेद व्यास यांचे पूजन करण्यात आले. या नंतर द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. या मध्ये गायन, नृत्य कथक व भरतनाट्यम  आणि गोष्टी द्वारे गुरूचे आणि व्यास पूजनाचे महत्व सर्वांसमोर …

गुरुपौर्णिमा २०२२ Read More »

“अनामवीरा” या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग संपन्न

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या  कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स द्वारे “अनामवीरा” या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग  काल  दिनांक ७ जुलै २०२२ रोजी,  राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा  येथे  शाळेच्या  रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभा मध्ये करण्यात आला. त्याची काही क्षणचित्रे.              

“सिने सृष्टि भारतीय दृष्टि” या दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

  सिने सृष्टि भारतीय दृष्टि”_भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवच्या निमित्ताने संस्कार भारती आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ मे २०२२ रोजी झालेल्या दोन दिवसीय National seminar मध्ये मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे प्रथम व द्वितीय वर्षाचे संगीत, नृत्य आणि नाट्य विधेचे विद्यार्थी प्राध्यापकांसह सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. योगेश सोमण सरही …

“सिने सृष्टि भारतीय दृष्टि” या दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग Read More »

“अनामवीरा”_देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनामवीरांना संगीत, नृत्य, आणि नाट्याद्वारे आदरांजली

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त म.ए.सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी ‘अनामवीरा’ या कार्यक्रमाद्वारे संगीत, नृत्य, आणि नाट्याच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनामवीरांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम रविवार, दि. १० एप्रिल २०२२ रोजी सायं. ६ वाजता मयूर कॉलनीतील मएसो सभागृह येथे संपन्न झाला. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ अशी देशभक्तीपर समूहगीते, त्यावर आधारित नृत्याविष्कार, ‘फेकला …

“अनामवीरा”_देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनामवीरांना संगीत, नृत्य, आणि नाट्याद्वारे आदरांजली Read More »

CLOSE
CLOSE