स्नेह, पुणे संचालित आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित तीन महिन्यांच्या ‘अभिनय कौशल्य कार्यशाळेची’ दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सांगता झाली.
श्री. योगेश सोमण सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर २०२२ पासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार सायं. ६ ते ९ या कालावधीत, ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली.
कार्यशाळे दरम्यान नाटकाचे विविध नाविन्यपूर्ण एक्सरसाईज घेण्यात आलेच पण त्याच बरोबर शास्त्रीय संगीत, नृत्य, रोप मल्लखांब या सारख्या गोष्टींची तोंडओळख देखील विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. एका नटाच्या जडणघडणीत या सगळ्यांचा कसा वाटा असतो हे सांगण्यात आले. मुलांनी अत्यंत उत्साहाने या सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेतला आणि संपूर्ण process enjoy केली.
मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्राध्यापक प्रा. सुखदा दीक्षित व प्रा. वृषाली लेले यांनी संगीत व नृत्याची sessions घेतली.
या कार्यशाळेची काही क्षणचित्रे