आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध कार्येक्रम करण्यात आले.
सुरवातीला समन्वयक प्रा.पौरवी साठे आणि प्रा. आदित्य देशमुख यांनी दीपप्रज्वलन केले, संस्थापकांचे आणि महर्षी वेद व्यास यांचे पूजन करण्यात आले.
या नंतर द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. या मध्ये गायन, नृत्य कथक व भरतनाट्यम आणि गोष्टी द्वारे गुरूचे आणि व्यास पूजनाचे महत्व सर्वांसमोर सांगण्यात आले.
या नंतर प्रा. आदित्य देशमुख सर यांनी शिक्षकांच्या वतीने गुरू बद्दल भाव या संदर्भात अत्यंत उपयुक्त आणि भावनिक असे संबोधन केले.
श्रद्धा आणि लीनते चा विचार सदैव अंगिकारले पाहिजे असे त्यात सांगण्यात आले .
या प्रसंगी प्रा. रश्मी देव (नाट्य विभाग), प्रा. सुखदा दीक्षित (संगीत विभाग), प्रा. अबोली थत्ते (कथक विभाग) आणि प्रा. वृषाली लेले (भरतनाट्यम् विभाग ) , तसेच सर्व विभागांचे विद्यार्थी उपस्थित होते.