वाचन प्रेरणा दिना निमित्त पुस्तकांचं गाव विश्वस्त संस्था आयोजित ‘उत्सव शब्दांचा’ या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन भिलार या पुस्तकांच्या गावात केले गेले होते.
उत्कृष्ट कलानिर्मितीसाठी तरुण कलाकारांनी काय वाचायला हवे? या विषयावर उदघाटक डॉ. उमा कुलकर्णी, तसेच मंगला गोडबोले, पुरुषोत्तम बेर्डे, योगेश सोमण, मिलिंद शिंत्रे आणि अभिराम भडकमकर अशा विविध मान्यवर मार्गदर्शकांची सत्रे झाली
महाविद्यालयातील नाट्य विभागाचे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते .
एक वेगळा आणि उत्तम अनुभव मुलांनी घेतला.