दि. २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मूक-अभिनय कार्यशाळा (Mime Workshop) मएसो मुलांचे विद्यालयातील (भावे स्कूल) प्राचार्य प्र. ल. गावडे सभागृहात आयोजित केली आहे .या कार्यशाळेची संकल्पना महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या प्रादेशिक सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. योगेश सोमण यांची असून श्री. सुमित कुमार ठाकूर हे या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक आहेत.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एयर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालय सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, महाविद्यालयाचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या क्षेत्रीय संचालक श्रीमती निशी बाला, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) च्या प्रादेशिक सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. मुकुंद तापकीर, श्रीमती संजीवनी स्वामी आणि कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे सर्व प्राध्यापक वर्ग असे सर्व मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेमध्ये अफगाणिस्तान, बोट्स्वाना, श्रीलंका, बांगलादेश , उझबेकिस्तान इ. देशांचे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) चे पूर्व नोंदणी केलेले विद्यार्थी आणि कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे सर्व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.