किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि स्वरावर्तन फाउंडेशन यांच्या तर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांगीतिक सोहळा रविवारी सायंकाळी ५ वाजता म. ए. सो सभागृह, मयूर कॉलनी , कोथरूड येथे होणार आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर आणि महाराष्ट्र्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एयर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सत्कार सोहळ्यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफिल होणार आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे.