महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि म ए सो कलावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त “गूंजे बनकर देश राग “ हा संगीत, नृत्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी म ए सो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात देस रागावर आधारित अनेक गायन व नृत्य प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. या मध्ये लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच समूहगीतांंचा समावेश असेल.
या कार्यक्रमाची संकल्पना संहिता आणि मार्गदर्शन महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या मार्गदर्शक मा. अंजली मालकर यांची असून याचे सादरीकरण स्वतः अंजली ताई मालकर, कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच म.ए.सो च्या शाळांमधील संगीत शिक्षक आणि विद्यार्थी असे सगळे मिळून करणार आहेत.

या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
धन्यवाद.