भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त म.ए.सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी ‘अनामवीरा’ या कार्यक्रमाद्वारे संगीत, नृत्य, आणि नाट्याच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनामवीरांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम रविवार, दि. १० एप्रिल २०२२ रोजी सायं. ६ वाजता मयूर कॉलनीतील मएसो सभागृह येथे संपन्न झाला.
‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ अशी देशभक्तीपर समूहगीते, त्यावर आधारित नृत्याविष्कार, ‘फेकला तटाहून घोडा’ या सारख्या कवितांचे नाट्यात्मक सादरीकरण, पोवाडे, काव्यवाचन यांच्या सादरीकरणातून हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. स्वातंत्र्य समरात प्राणांची आहुती दिलेल्या काही निवडक स्वातंत्र्य सेनानींच्या मातांच्या मनातील भाव नाट्यरूपाने मांडणारे ‘जननी जन्मभूमीश्च’हे सादरीकरण उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे ठरले.
या संपूर्ण संकल्पनेला म ए सो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् च्या सर्व प्रोफेसर आणि समन्वयक यांनी गेला महिनाभर मेहनत घेऊन या कार्येक्रमास रूप दिले.
प्रा रश्मी देव (नाट्य विधा)
प्रा अबोली थत्ते (नृत्य विभाग)
प्रा वृषाली लेले (नृत्य विभाग)
प्रा सुखदा दीक्षित (संगीत विभाग)आणि
प्रा पौरवी साठे (समन्वयक)
सर्व प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयतन्याने या कार्येक्रमचा दर्जा उठावदार झाला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीव सहस्रबुद्धे, मा. उपाध्यक्ष सीए श्री. अभय क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे परीक्षक श्री. विवेक वाघ, शास्त्रीय गायिका सौ. अंजली मालकर, श्रीमती प्राजक्ता अत्रे, विद्यार्थी, पालक व हितचिंतक उपस्थित होते.
मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व विधांमधील विद्यार्थ्यांनी प्राध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यापासून संहिता लेखन, निवेदन, अनुक्रम इत्यादी सर्व बाजू एकत्रितपणे उत्तम पद्धतीने हाताळल्या.
मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या महाविद्यालयीन सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, समितीचे सदस्य गोविंद कुलकर्णी आणि महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक योगेश सोमण यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.