सिने सृष्टि भारतीय दृष्टि”_भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवच्या निमित्ताने संस्कार भारती आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ मे २०२२ रोजी झालेल्या दोन दिवसीय National seminar मध्ये मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे प्रथम व द्वितीय वर्षाचे संगीत, नृत्य आणि नाट्य विधेचे विद्यार्थी प्राध्यापकांसह सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. योगेश सोमण सरही कार्यक्रमास उपस्थित होते.
यामध्ये मूळ स्वातंत्र्य पूर्व काळातील चित्रपटांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान या विषयाला अनुसरून एकूण ७ sessions झाली, ज्यामध्ये स्वातंत्र्य पूर्व काळातील चित्रपटाशी निगडित अनेक पैलूंवर चर्चा झाली. सेमिनारमध्ये या क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या त्यामध्ये पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री पद्मश्री आशा पारेख, श्री. राजदत्तजी, श्री. विजयेंद्र प्रसाद , श्री. सच्चिदानंद जोशी, श्री. अर्जुन राम मेघवाल, पद्मश्री प्रसुन जोशी, श्री. सुभाष घई, श्री.ओम राऊत, श्री. सुबोध भावे, श्री.भरत बाला, वसंत साई इत्यादीया सेमिनार मुळे महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना एक चांगला अनुभव मिळाला.
विशेष बाब म्हणजे या दोन दिवसीय सेमिनार मधील उदघाटन व समारोप समारंभाच्या निवेदनाची जबाबदारी आपल्या नाट्य विधेच्या प्रा.रश्मी देव यांनी उत्तम रीतीने पार पाडली.