२० जुलै, २०२२ ला ‘द प्लॅन’ या नाटकाचा प्रयोग भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘भारत रंग महोत्सवात’ यशस्वीरित्या झाला.या प्रयोगासाठी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी पूर्ण वेळ उपस्थित होत्या. ‘द प्लॅन’ च्या संपूर्ण टीम चे तसेच लेखन व दिग्दर्शनाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. याच बरोबर या नाटकाचे प्रयोग भारतात सर्वत्र होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील ‘द प्लॅन’ चे दिग्दर्शक श्री. योगेश सोमण यांचे विशेष कौतुक केले व एक उत्तम कलाकृती बघण्यासाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद दिले. या प्रयोगासाठी NSD चे डायरेक्टर डॉ. रमेश गौड आणि संस्कारभारती अखिल भारतीय संघटन मंत्री दादा गोखले आवर्जून उपस्थित होते.