‘द प्लॅन’ या नाट्याची निर्मिती संस्कार भारती पश्चिम प्रांताची असून, आयोजन विवेक व्यासपीठाने केले आहे. याचे लेखन अभिनेते/दिग्दर्शक/लेखक श्री. योगेश सोमण ( मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस् चे मुख्य सल्लागार) यांनी केले असून दिग्दर्शन श्री. योगेश सोमण आणि सहा. प्रा. रश्मी देव, मएसो कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस्, नाट्य विभाग असे दोघांनी केले आहे.
या नाटकात आपल्या नाट्य विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी वैभव दुधकोहळे याने कृष्णा कर्वे या पात्राची मध्यवर्ती भूमिका केली आहे व तृतीय वर्षाच्या वेदिका भंडारे व अन्वीता वैद्य यांनी नेपथ्य सहाय्य केले आहे. आजपर्यंत याचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर असे मिळून ३६ प्रयोग झाले आहेत.
येत्या २० जुलै २०२२ ला या नाटकाचा प्रयोग भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘भारत रंग महोत्सवात’ होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (दिल्ली) द्वारे केले जाते व या महोत्सवात सादरीकरण करता यावे हे प्रत्येक नाट्यकर्मीचे स्वप्न असते. अशा ‘भारत रंग महोत्सवात आमच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होते आहे ही आमच्यासाठी अंत्यत अभिमानाची बाब आहे. सर्व विद्यार्थी, प्रा. रश्मी देव आणि ‘द प्लॅन’ च्या संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.