आज महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त संगीत विभागाच्या मार्गदर्शक मा. अंजली ताई मालकर यांचे व्याख्यान झाले. कलाकाराच्या आयुष्यातील गुरुचे स्थान , त्यांचे महत्व ताईंंनी वेगवेगळ्या गोष्टींद्वारे मांडले. या प्रसंगी सर्व विभागांचे विद्यार्थी तसेच प्रा. रश्मी देव (नाट्य विभाग), प्रा. सुखदा दीक्षित (संगीत विभाग) आणि प्रा. वृषाली लेले (भरतनाट्यम् विभाग ), आदित्य देशमुख (समन्वयक) आणि पौरवी साठे (समन्वयक) उपस्थित होते.